बी.एड्. फिजीकल - 1

  • 666
  • 1
  • 195

           बी.एड्. फिजीकल भाग 1               तीतारीख होती बुधवार दि. २७ एप्रिल ७७! कांदिवली गव्हर्नमेण्ट कॉलेजच्या बी.एड्. फिजीकल  कोर्ससाठी  प्रवेश अर्जा सोबतजोडायला सिव्हिल सर्जनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला मी मुणग्यातून सकाळच्या  देवगड  गाडीने रत्नागिरीला जायला निघालो  होतो. आदल्या दिवशी गोरेगावच्या निळूभाऊ गोखल्यांचं टपाल आलं. त्यातून तो प्रवेश अर्ज आलेला होता. अर्ज पाठवायची अंतीम  तारीख  होती ३० एप्रिल. मी साधले  क्लार्कनाअर्ज दाखवला. त्यानी छापिल  प्रवेश अर्जावर थेट माहिती न  भरता कोरा फुलस्केप घेवून त्यावरमाहिती भरून घेतली. अर्जासोबत शालेय व महाविद्यालयीन काळात  जिल्हा/ राज्यस्तरावर खेळांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक सहभाग, मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये मिळवलेली नैपुण्य पदकं, प्रशस्तीपत्रं जोडायची होती. मी शालेय