लाल्या: आठवणींच्या वळणावर

  • 588
  • 183

खूप दिवस झाले, लाल्याचा फोन आला नाही, म्हणून मी त्याला कॉल केला. त्यावेळी तो रात्रभर हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसलेला होता, हे कळताच मन सुन्न झालं, आणि अंतर्मनात काळोख दाटून आला. लाल्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, आणि तो अहोरात्र त्यांच्या सेवेत होता. त्याच्या थकलेल्या आवाजातूनच त्याच्या मनातील काळजी स्पष्ट जाणवत होती. त्यामुळे मलाही जास्त काही बोलता आलं नाही. फोन ठेवताच मनात एकच विचार उमटला—या कठीण क्षणी मी त्याच्या सोबत का नाही? कामाच्या व्यापात इतका गुरफटलो की, माझ्या जवळच्या माणसांसाठीही वेळ देऊ शकत नाही लाल्या हा माझ्या आयुष्यातील सर्व सुख-दुःखांचा साक्षीदार आहे. पण मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही? कधी कधी आपल्या माणसाला