घरी आल्यावर साधिका आधी फ्रेश होते आणि ध्यानाला बसते. तिने सकाळपासून काहीच न खाल्ल्याने उल्का तिला बोलवायला तिच्या खोलीत येते आणि साधीकाच्या भोवताली डोळे दिपवणारा प्रकाश पाहून ती स्तब्ध होते. तिचे डोळे भरून येतात. आजी आणि आई सतत ताईची काळजी का करायच्या हे तिला आता उमगले होते. ताईजवळ काही तरी खास आहे हे तिला सतत जाणवत होतं आणि त्याविषयी ती नेहमी आजीला विचारायची सुद्धा पण अपेक्षित असं उत्तर तिला मिळालंच नाही. ती तशीच किती तरी वेळ उभी होती. तेवढ्यात साधिकाला तिच्या आसपास कुणाच्या तरी असण्याची चाहूल लागताच ती ध्यानातून बाहेर येते. साधिका : काय ग उल्के काय झालं? उल्का :