भयाण वाडा - १

" वाडेगाव ..वाडेगाव " घंटीचा  टणटण असा आवाज करत कंडक्टर ने बस थांबवली..गाडी तशी रिकामीच होती .रात्रीची वेळ असल्याने फारसे प्रवासी गाडीत नव्हतेच. भल्या मोठ्या दोन बॅगा घेऊन प्रकाश आणि आरती हे दोघे उतरले.." साहेब ..इतक्या रातच्याला इथं कायले उतरता गावा बद्दल लई काय काय ऐकून हाय ..त्यात आज अमावस्या ..पावसापाण्याचे दिवस ..सोबत बाई माणूस..अन इथून गाव दोन कोसावर ,जंगलाचा रस्ता हाय म्हणून म्हणलं पुढं  मलकापूर एसटी स्टँड वर उतरा सकाळच्याले येऊन जाजा हिकडं" त्या दोघांना भयाण ठिकाणी उतरतांना बघून कंडक्टर बोलला.." नाही हो दादा ..आम्ही जातो नीट अन इथून जवळच आहे आमच घर एक कोसावर .पोहचू आम्ही अर्धा तासात"