नियती भाग ३ भाग ३ भाग २ वरून पुढे .. साइट वरून वापस येतांना मी प्रकाशला म्हणालो की “अरे त्यांचं काम झाल्यावर तुझा प्लॉट तुला वापस मिळेल मग काळजी कशाला करतोयस. माझ्या मते तू आता एखादी जास्त पगाराची नोकरी मिळतेय का ते बघ. म्हणजे सर्व कटकटी संपतील.” “हो रे बाबा आता उद्या पासूनच सुरवात करतो. अर्धा पाऊण पगार तर कर्जाचे हप्ते भरण्यातच जातोय. अजून अंगावर जबाबदारी नाहीये म्हणून बरय.” – प्रकाश. प्रकाशची फरफट तशीच चालू होती. तो नवी नोकरी शोधतच होता पण मिळत नव्हती. तशातच त्याची मुंबईला बदली झाली. दुष्काळात तेरावा महिना. आर्थिक परिस्थिति अजून खड्ड्यात. वैतागून असाच एकदा