नियती भाग २ भाग 1 वरून पुढे .. तुम्ही अगदी नी:संकोच बोला.” - एक अधिकारी. हे ऐकल्यावर आता प्रकाशच्या चेहऱ्यावर तरतरी आली. आम्ही पण जरा relax झालो. प्रकाशनीच बोलायला सुरवात केली “माहिती as such काहीच नाही. पालिकेच पत्र आल्यावरच कळल. हे पहा.” प्रकाश ने पत्र दिल. त्यांच्या पैकीच एक जण बोलला “ते सर्व आम्हाला माहीत आहे. पण मला सांगा की तुमचं घर जवळ जवळ 100 वर्ष जुनं आहे, तुमचे वडील, आजोबा कोणीतरी तर काहीतरी बोललं असेल जरा प्रयत्न करा, आठवून बघा.” “आजोबा काय आणि वडील काय कोणी या बाबतीत बोललं नाही. हां पण आजोबा एकदा गोष्ट सांगत असतांना घराण्या