नियती भाग १

  • 297
  • 72

नियती  भाग  १ त्या दिवशी रविवार होता. चांगला मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि आता रिमझिम चालू होती. बायको माहेरी गेली होती त्यामुळे आता काय करांव याच विचारात होतो. अश्या वेळी बायको असती तर तिला भजी आणि कॉफी करायला सांगितली असती आणि गॅलरीत बसून छान आस्वाद घेतला असता. शेवटी ठरवल की आपणच करावी. मग तयारीला लागलो. प्रथम कांदा आणि बटाटा चिरणे आले. चला भजी हवी असेल तर पर्याय नाही. किचन कडे मोर्चा. दारावरची घंटी वाजली. दार उघडल तर माझा जिवलग मित्र प्रकाश उभा, चेहरा गंभीर. “कायरे काय झाल ? ये ये. आतच चल मी मस्त भजी करतोय भजी खाऊ, कॉफी