गुप्तलिपीचे रहस्य

आत्ता पर्यंतच्या केसेस मधली ही सगळ्यात आव्हानात्मक केस होती आणि तरीही ती यशस्वी रित्या पार पडली याचं मला समाधान आहे. "हॅलो राघव!", पलीकडून इन्स्पेक्टर नाईकांचा आवाज "हो बोलतोय, काय झालं सांगा",मी म्हंटल. "खूप महत्त्वाचं काम आहे ,पोलीस स्टेशन ला येशील का ?" "हो लगेच पोचतो",मी मी पोलीस स्टेशनात पोचलो. "बोला इन्स्पेक्टर नाईक काय झालं? का एवढ्या घाईघाईने बोलवून घेतलं",मी "बाबच तशी आहे, फार गंभीर बाब आहे",इन्स्पेक्टर नाईक "तेच सांगा म्हणतोय",मी "होहो सांगतो,जरा आतल्या केबीन मध्ये ये",इन्स्पेक्टर नाईक आत एक गृहस्थ बसले होते. "हे मंत्री अण्णासाहेब जहागीरदार यांचे सचिव अक्षय गंधे,यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय",इन्स्पेक्टर नाईक "त्याचं काय आहे, अण्णासाहेब जहागिरदारांचा ई-मेल अकौंट हॅक झालाय आणि त्यामुळे फार अडचण निर्माण झालीय. महत्वाचा