कोण? - 25

  • 261

भाग - २७   काही वेळाने शशांक बोलला, " बघीतल्यासारख वाटत यांना कुठेतरी." तेव्हा आईने म्हटले, "जाऊ दे तीचे काय आहे, आपल्याला तर कोमल विषयी बोलायचे आहे. तर तू आणि कोमलने एक होण्याचा निर्णय घेतला आहे. तर मला सांग कोमल हि आजन्म अशीच अपंग राहणार आहे. तर मग तीचा संभाळ तू जन्मभर करशील. जर असा करशील तर माझा कसलाही विरोध नाही आहे. उलट मी स्वतः तुमचा दोघांचे लग्न लावून देईल." तेव्हा शशांक म्हणाला, "काय काय म्हणालात तुम्ही, कोमल आता आजन्म अपंग राहणार आहे. परंतु तीने तर मला सांगीतले आहे कि तीचे ऑपरेशन झाले आहे आणि ती लवकरच चालायला लागणार आहे." तेव्हा