ती.......

  • 480
  • 147

ती चा जन्म झाला तेव्हा घर कसं बहरून गेलेलं  घरात लक्ष्मी आली म्हूण सगळे आनंदात होते पेढे वाटून सगळयांना संपत नव्हते तिला पाहण्यासाठी संगे सोयरे नातेवाईकाची रेलचेल चालू होती थोड्याच दिवसात बारसा पार पडलं तिला शोभेल असे नाव  ठेवण्यात आले      ती आता शाळेत जाऊ लागली हुशार विद्यार्थिनी म्हूणन ती शाळेत नावाजलेली घरी हि एकुलती एक लेक म्हूणन तिचे लाड व्हायचे वर्ष सरत होती आणि ती दहावी उत्तीर्ण झाली तिनी यशाची पहिली पायरी सहज पार केली मग बारावी उच्च शिक्षण घेऊन तिनी पदवी मिळवली तिच्या कुर्तृत्वावर तिला चांगली नोकरी मिळाली आई बाबा दोघांना हि तिचा अभिमान वाटे