ऑफिस सुटल्यानंतर घरी जात असताना, यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?" हे गाणे सुरू झाले. हे गाणे आधीही अनेक वेळा ऐकले होते, पण आज मात्र मी स्वतःलाच विचारू लागलो—सुख म्हणजे नक्की काय? आनंद म्हणजे काय?आपण एवढेच म्हणू शकतो की "मी आनंदी आहे" आणि त्याचा अनुभव घेऊ शकतो, पण आनंद मोजता येत नाही. पूर्वी आपले संत आणि आध्यात्मिक गुरु सुखी होण्याचे मार्ग सांगायचे. मात्र, वाचनाची आवड कमी झाली आणि असे मार्गदर्शकही आजूबाजूला राहिले नाहीत. त्यामुळे आता गुगलशिवाय पर्याय उरलेला नाही!जेव्हा मी गुगलवर "सुख" याची व्याख्या शोधली, तेव्हा मला महान तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांचे काही विचार वाचायला मिळाले आणि काही