डोमेस्टिक हेल्पर पूर्वी मोलघेऊन घरकाम करणाऱ्या बायकांना मोलकरीण म्हणत असत पण आजकाल शहरात त्यांना मेड किंवा डोमेस्टिक हेल्पर म्हंटले जाते.आमच्याकडे अनेक गमतीदार डोमेस्टिक हेल्पर होऊन गेल्या. त्यांच्या एकाहून एक गमतीदार किस्से आहेत,तेच मी आता सांगणार आहे.मी,माझी मोठी बहीण,माझे आईबाबा आणि माझे आजी- आजोबा असं आमचं कुटुंब आहे,माझ्या आजोबा एक नंबर चे खवय्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने केलेले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात.एकदा त्यांनी फर्मान काढलं,"इंदू(आजी) आणि सुषमा(आई) आता तुम्हाला जरा सुट्टी द्यावी म्हणतो,रोज रोज तेच ते काम करून तुम्हाला ही कंटाळा येत असेल आणि तुम्ही केलेला 'रुचकर'(असं म्हणून माझ्या बाबांकडे बघून त्यांनी डोळे मिचकावले) स्वयंपाक खाऊन आम्ही सुध्धा तृप्त झालो 'ओब्ब'