चाळीतले दिवस - भाग 11

  • 303
  • 72

चाळीतले दिवस भाग 11.    मी कॉलेजला नियमितपणे जात असलो तरी माझे सगळे लक्ष पोस्टाने येणाऱ्या त्या संभाव्य पत्राकडे लागलेले होते.दररोज घरी पोचलो की पोस्टमन येऊन गेला का याची मी चौकशी करायचो.   माझे बंधू आणि वहिनीं मुलांसहीत काही दिवस पुण्यातल्या घरी तर काही दिवस वहिनींच्या माहेरी असायचे.  डिसेंबर 1981 च्या दुसऱ्या आठवड्यात मी ज्या पत्राची वाट बघत होतो ते पत्र एकदाचे आले.पत्र वाचून मला प्रचंड आनंद झाला.   पुणे टेलिफोन्सकडून मला टेलिफोन ऑपरेटर पदासाठी निवडले गेले होते!    28 डिसेंबर 1981 रोजी माझे तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरु होणार होते.   पहिल्या दिवशी सदर्न कमांडशेजारी असलेल्या ऑफिसात जायचे होते.  मी अर्धा तास आधीच