मर्यादा एक प्रेमकथा - 1

  • 921
  • 324

भास्कर आबासाहेब पाटील कोल्हापूरचे आमदार आबासाहेब पाटील यांचा मुलगा.... नावातच सूर्य आहे त्यामुळे सूर्यासम तेजस्वी, देखणा कोल्हापूरचा गडी , ब्राऊन कलरचे सुंदर डोळे, नाकाच टोक सरळ, ओठ गुलाबी गुलाबी कोणालाही मोहवतील असे , काळेभोर केस.जिम मध्ये तयार केलेली भारदस्त बॉडी, त्याचे मसल्स,  सहजच पाहता क्षणी गारद होईल अशी....आबासाहेब पाटील आणि त्याचे फारसे पटायचे नाही कायम घरात वादावादी सुरू असायची , त्याची आई सुवासिनी मध्ये पडल्या शिवाय काही भांडण संपायचे नाही .राजकारण्याचे कुटुंब म्हटल्यावर घरात ही तेच वातावरण असायचे, कोणाचा कुणाशी ताळमेळ बसत नव्हता .भास्करच्या आजीसाहेब मालतीदेवी यांचाच शब्द घरात चालायचा , त्या म्हणतील तस आणि तेच त्यांच्या घरी चालत असे.....थोडक्यात काय