तो घाईघाईने रस्त्याने चालत होता. आज ऑफिस सुटायला बराच वेळ झाला होता. रात्रीचे साधारण अकरा वाजले असावे. पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्याने लगेच जवळची छत्री उघडली आणि तो सारखा मनगटावरील घड्याळात बघत बघत तो भराभर पावलं उचलू लागला. सगळीकडे सामसूम वातावरण होतं. किर्रर्र अंधार आणि निर्मनुष्य रस्ता. एक दहा मिनिटं चालल्यावर तो त्याच्या ऑफिस जवळ असलेल्या नेहमीच्या बस स्टॉप जवळ आला. भराभर चालल्याने त्याला कपाळावर घाम आला तो त्याने रुमालाने पुसला. ' चला पोचलो बाबा एकदाचं वेळेवर, शेवटची बस चुकली असती तर वांधा झाला असता ' असा विचार करत त्याने बस स्टॉप वरच्या बेंचवर बूड टेकवलं. छत्री बंद करून