जात या कादंबरीबद्दल जात या नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना मला आनंद होत आहे. ती माझी एकशे दोनवी पुस्तक आहे. जात या पुस्तकाबद्दल सांगतांना मलाही संभ्रमच वाटतो. कारण माझी ही एकशे दोनवी पुस्तक जरी असली तरी वाचकांच्या गर्दीत माझी पुस्तक तेवढी गर्दी करीत नसल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे. जरीही कसदार लेखन व विचार माझ्या पुस्तकात आहेत असं काही वाचकांचं म्हणणं असलं तरी. याबाबत एक फोन होता. गोविंद गोपाळ गायकवाड नावाची कादंबरी. ही कादंबरी त्यांनी ई साहित्याच्या साईटवर वाचली होती. त्यावेळेस त्या वाचकांचं म्हणणं होतं की शिवाजी सावंतच्या छावा कादंबरीत संभाजी महाराजांचं वर्णन