बेधुंद

"मला तर बाई काही पटत नाही! आमच्या वेळेस असं काही नव्हतं." शुभांगी "मॉम! आता जमाना बदलला. तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं चालेल?" सारा बेफिकीरीने बोलली."पहा हो! ही काय म्हणते ते!" शुभांगी, साराच्या बाबांकडे म्हणजे सुधीर कडे पाहून म्हणाली."जाऊ दे! शुभा! चालायचंच. आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुसार आपले मतं बदलावे लागतील. जाऊ दे साराला. सुशांत आणि त्याची फॅमिली घरंदाज आहे तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही." सुधीर ची परवानगी मिळताच सारा खूप आनंदित झाली."चला मी जाते बॅग भरायला. दुपारी शॉपिंग ला सुद्धा जायचंय." असं म्हणून सारा तिच्या खोलीत चालली गेली. तेवढ्यात तिला सुशांत चा फोन आला, "झाली की नाही प्रि वेडींग शूट ला जायची तयारी सारा