बरसुनी आले रंग प्रीतीचे - 39

  • 1.2k
  • 672

आता त्याला खरच बेडरूम मध्ये जायचं नव्हतं ... तिच्याशिवाय ती रूम अपूर्णच होती.. त्यापेक्षा स्टडी रूममध्ये जाऊन फुटेज बघू या म्हणून तो तिथे गेला ... पण हा सगळं प्रकार लपून पिलर मागून कोणीतरी बघत होत.... आणि त्याची ह्या दोघांना कल्पना सुद्धा नव्हती....!!!रात्र भर ऋग्वेद फुटेज चेक करत होता... त्याला प्रिया सकाळी हॉस्पिटल मध्ये येताना दिसली आणि रिपोर्ट घेऊन जाताना .... ह्याच्यापेक्षा संशयास्पद असं काहीच आढळून आलं नाही सकाळीच स्टडी रूम साफ करायला maid आल्या तस तो फ्रेश व्हायला रूममध्ये गेला ... आजचा दिवस खूप महत्वाचा होता त्यामुळे ऑफिसमध्ये लवकरच जायचं होत.... प्रणिती तीच यावरून खाली आली... पूजा वैगरे करून ती ब्रेकफास्ट बनवायला