शाळा हे सुसंस्कार रुजविण्याचं केंद्र. *आज अशी बरीचशी मंडळी पाहतो की त्यांना किती शिकले असं विचारले असता चक्कं सांगतात की पाचवी शिकलो. कुणी सातवी तर कुणी दहावी सांगतात आणि स्वाक्षरी करा म्हटलं तर अंगठा लावतात. यावरुन शिक्षणाची परिभाषा लक्षात येते. परंतु त्यांचेकडे पाहिलं तर ते व्यक्तीमत्व सालस स्वरुपाचं दिसून येतं. त्यांच्यात सुसंस्कार दिसतात. त्याचं कारण असतं, त्यांची शाळा. त्यांच्या शाळेनं ते शिकत असतांना त्यांच्यात संस्कार फुलवलेले असतात. त्यांना सुसंस्कारीत केलेलं असतं. जे सुसंस्कार घरात व परीसरात मिळत नाहीत.* विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यांना सुसंस्कृत बनवायला हवे. त्यांना सुसंस्कृत बनवून त्यांना सुसंस्कारीत करायला हवे.