जात (कादंबरी) अंकुश शिंगाडे जात फोफावत चालली होती व त्याची झळ दिक्षाला जाणवत होती. दिक्षाच्या विवाहाला गावानं स्विकारलं होतं. परंतु बिरादरी? त्या बिरादरीनं दिक्षाला स्विकारलं नव्हतं. शिवाय तिची जात जातबंधनंही पाळत होती. शिक्षणही निःशुल्क नव्हतंच जातीचं. ते पाहून दिक्षाच्या मनात विचार आला होता. निदान शिक्षणात तरी जातीचा वापर होवू नये. जात असावी. परंतु ती माणसाची एक ओळख म्हणून. जातीवरुन जाच नसावा व जातीवरुन भेदभावही नसावाच. जात आणि जातीप्रथा केव्हा नष्ट होणार. हा एक चिंतेचा प्रश्न होता. जातीप्रथा देशात पाळली जात होती व त्याच आधारावर भेदभाव करुन जाणीवपूर्वक जाणूनबुजून अत्याचार केला जात होता. ज्याचे बिजारोपण शाळेतच केले जात होते. शाळेतही जातीप्रथा