वानवळा

  • 480
  • 153

Blessed by God वानवळा याचा शब्दशः अर्थ नुकत्याच केलेल्या अथवा एखाद्या ताज्या गोष्टीचा नमुना देणे नवीन आलेले फळ, नवीन पदार्थ.. ताजा असतानाच देणे..यामध्ये देणाऱ्या व्यक्तीचे प्रेम अधोरेखित होते मित्रांचे प्रेम आणि आपुलकी ️ मिळणे ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे जी नशिबानेच मिळते.म्हणूनच पहील्या ओळीत देवाच्या आशीर्वादाचा उल्लेख आहे.अशाच काही आयुष्याच्या प्रवासातल्या मौलिक वानवळ्या च्या गोष्टी...  एका मित्राच्या गुऱ्हाळ घरातलेहे एक एक किलोचे गुळाचे रवे घरी पोचवले जातात... याला "पिल्ल" म्हणतात .पुर्वी त्यांच्या गुऱ्हाळ घरात गेले की भरपूर रस पिऊन, गुळ खाऊन, गरम गुळाची साय खाऊन पाहुणचार घेतला की जाताना काही न बोलता असे रवे एका पिशवीत घालून सुपूर्द केले जात...किती हा गुळ?अहो एवढा कशाला?अशा वाक्याना