१) नदी ग ..युगानुयुगे वाहत असतेस तुदोन्ही किनार्याना धरून कीती स्थित्यंतरे झाली जगात त्या साऱ्यांना सोबत घेऊन अनेक ऋतु आले आणी गेले तुझ्या प्रवाहात बदल नाही झाले आयुष्ये बदलत असतात काठावरच्या माणसांची तुला काहीच खबर नसते जणु कशाची आणी कुणाची .तुला पाहतात कुणी देव मुर्तीच्या रूपात आणी पुजतात मंदिराच्या गाभार्यात आला जरी कंटाळा कधी थांबायची “मुभा” नाही तुला कधी वाटले जर असे तुझ्या मनाला तर “आमंत्रण “च असेल ते तुझ्या मृत्यूला !विचार करते ना जेव्हा मी तुझ्या मनाचा खरेच ठाव च लागत नाही ग तुझ्या प्रवाहाच्या तळाचानवल वाट्ते पाहुन तुझे” उदंड “वाहाणे तुझ्या अस्तित्वाने तर “सुसह्य “होत असते माणसाचे जगणे !!२)शहर ..शहर पुर्वी जागे व्हायचे “झुंजुमुंजू “च्या सुवासाने “देवळातल्या घंटेच्या नादाने सुवासिनींच्या सडा रांगोळीने आणी