टाईम मशीन

  • 669
  • 177

"पार्थ, आम्ही जाऊन येतो लग्नाला, खरं तर तू ही यायला पाहिजे होतं." पार्थ ची आई म्हणाली."हो न! एवढा काय तो अभ्यास करायचा? जरा बाहेर पड, तुलाही बदल घडेल." पार्थ चे बाबा म्हणाले."नको बाबा, पुढच्या वेळेस मी येईन आता तुम्ही जा. मी नीट राहीन." पार्थ म्हणाला."बरं! तुझा मित्र येणार आहे न रात्री झोपायला? नाहीतर काकांकडे जा रात्री. घरी एकटा राहू नको आणि हो, प्रयोग शाळेत चुकूनही जाऊ नको, कळलं?", पार्थ चे बाबा त्याला सक्त ताकीद देत म्हणाले."हो बाबा! मी करतो व्यवस्थित मॅनेज. तुम्ही काळजी करू नका. मस्त एन्जॉय करा लग्नात. हॅपी जर्नी!!", पार्थ ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला.पार्थने आईबाबा बाहेर