दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 9

  • 927
  • 378

अभिमन्यू आरतीला घेऊन हॉलमध्ये येतो. तेवढ्यात सधिकाही कॉफी आणते. या तिघांच्याही डोक्यात विचारांचे काहूर माजते.  साधिका : काकू, मला सांगा…तुम्ही काही प्यायला किंवा बाहेर काही खाल्ले होते का?  आरती : मी बाहेरच सहसा खात नाही…आणि भोवळ कशी येईल? मी चहा - नाश्ता करून गेले होते. हा, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायले…पण पाण्याची बॉटलही माझीच होती…  साधिका : मला दाखवता का बॉटल… आरती : अभिमन्यू, माझी पिशवी आणतोस का?  अभिमन्यू : हो,  साधिका : काकू अजून काही आठवत का?  आरती : हो, अभिमन्यूची विद्यार्थिनी भेटली होती. तिच्याशी बोलले आणि याला गवार आवडते म्हणून मी पुढे आले. भाजी घेतल्यावर घराच्या