बरसुनी आले रंग प्रीतीचे - 31

  • 717
  • 1
  • 378

दहा बारा दिवस असेच निघून गेले... प्रणिती आणि वेद पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते... कृतीतून जाणवत होत पण ओठावर कोणीच आणलं नव्हतं ... ऋग्वेद तिला propose करायची तयारी करत होता पण कामाच्या व्यापात तो इतका गुरफटला होता कि स्वतःवरच लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नव्हता... प्रणिती त्याला पूर्ण समजून घेत होती.... पण तिला सुद्धा वाटायचंच कि बाकीच्यांसारखं त्याने पण तिला वेळ द्यावा पण सांध्याची परिस्थिती बघता ते शक्य च होत नव्हतं... मॉम सगळं बघत होत्या... प्रणिती रात्री अकरा अवेपर्यंत उपाशी त्याच्यासाठी जागी राहायची अर्थात तो सुद्धा काही मुद्दाम करत नव्हता किव्हा कुठे फिरायला जात नव्हता .... प्रोजेक्ट च एवढं मोठे होते