शिक्षणातून संस्कार रुजावेत

  • 1k
  • 273

शिक्षणातून संस्कार रुजावेत?         शिक्षणातून संस्कार रुजायला हवं. कॉपी करणं पापच. परंतु अलिकडील काळात शाळेतील विद्यार्थी हे कॉपी करीत असतात आणि त्यांनी कॉपी करु नये म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परंतु कितीही अशा प्रकारचे अभियान राबवले गेले तरी कॉपी ही कॉपीमुक्त होणार नाही. कारण जे संस्कार आलेले असतात. ते संस्कार हे अभ्यासक्रमातूनच आलेले असतात नव्हे तर ते राबविणाऱ्या घटकातूनही आलेले असतात. त्यातच त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा परीसरही भर टाकत असतो. महत्वाचं म्हणजे असं होवू नये म्हणून अभ्यासक्रमच तयार करतांना तो संस्कारक्षम तयार करावा. तो राबविणारा घटकही संस्कारक्षम असावा आणि त्याचा परीसरही संस्कारक्षम बनावा. जेणेकरुन संस्कार त्या विद्यार्थ्यात रुजेल.