स्मशानाची राख पावसाळा सुरु झाला होता.आता पाऊसही फार कोसळत होत्या.नदीनाल्यांना फार पूर होता.नदीचं पाणी ओसंडून वाहात होते.पूराचं पाणी गावात पसरल्यानं अख्ख गाव वाह्यलं होतं.याच गावातील लोकांना ज्या गावातील नदी मदत करीत होती.ती नदी अक्राळविक्राळ रुप धारण करुन आज गावाची परीक्षा पाहात होती.काही लोकं वाहात होते तर काहींचं धान्य ही वाहून गेलं होतं.सुजयनं या पुरात आपला जीव धोक्यात घालून काही लोकांना वाचवले होते तर काहींना धान्य घेण्यासाठी सोने देवून त्यांना जगवले होते.जणू त्याने या परीस्थितीत गावावर उपकारच केले होते. सुजय गावातील एक तरुण होता.तो बारावी शिकलेला होता.पण गावात रोजगार नसल्यानं पिढीजात व्यवसाय म्हणून त्याने आपल्याच बापाचा हा