चुकांमुक - भाग २

  • 945
  • 522

चुकामुक भाग २ भाग १ वरुन  पुढे वाचा.........   सुनंदाबाई आणि त्यांचं कुटुंब सरळ देवळात गेलंच नाही. देवळाच्या शेजारीच थोड्या अंतरावर त्यांच्या ओळखीचे कोणी राहत होते त्यांच्या कडे गेले. सगळ्यांनी तिथे आपापल्या आंघोळी वगैरे आटोपल्या. सुनंदाबाईंना मुलगा होता, त्यामुळे त्यांची मुलीची हौस त्या नीतावर भागवून घेत होत्या. त्या नीता मधे इतक्या गुंतून गेल्या होत्या की, जणू काही ती त्यांचीच मुलगी होती. त्यांनी तिला छान न्हायला घातलं आणि केस छान विंचरून त्याचा पोनिटेल बांधला आणि वरतून तीचाच हेअर बॅन्ड लावला. तिला तिच्याच पिशवीत आणलेला एक स्कर्ट ब्लाऊज घातला. पोरगी इतकी गोड दिसत होती की सुनंदाबाई ज्यांच्या कडे उतरल्या होत्या त्यांनी लगेच