चुकामुक भाग १ योगेशला त्याची आई म्हणत होती की “अरे इतके दिवस झालेत, तुझ्या बायकोला काही आराम पडत नाहीये, काही तरी कर बाबा, एवढी तरणी ताठी पोर अशी अंथरूणाला खिळलेली बघवत नाहीरे. परत पदरात एक लहान मुलगी आहे, तिचा तरी काही विचार कर.” “अग आई, डॉक्टर जसं म्हणतात, तसं सगळं तर आपण करतो आहोतच. आपल्याला त्यातलं काय समजतंय? बरं दोन डॉक्टर पण बदलून झालेत, आता आणखी काय करू ते तूच सांग.” योगेश. “मी सांगेन तसं करशील का?” आई विनवणीच्या स्वरात म्हणाली. “आई, अग असं का म्हणतेस, तू काही म्हंटलस आणि मी नकार दिला, असं कधी झालंय का?” योगेश दुखावल्या