ऍडव्होकेट ठमी "सुमे!! मला माहितीये तूच माझा मेकअप बॉक्स चोरला आहे. काल मी सगळ्यांना तो दाखवत असताना तुझीच वाईट नजर होती त्यावर. " कुमी फणकारत म्हणाली."वा ग वा! तू काहीही म्हणशील आणि मी काय ऐकून घेईन होय!" सुमी रागावत म्हणाली."गल्स! रिलॅक्स! मी आहे न! सो चिल! आय विल मॅनेज एव्हरीथिंग!" ठमी अगदी ठामपणे म्हणाली आणि मला एकदम ठसका बसला. ठमी अतिवेगाने तिच्या घराकडे पळाली आणि थोड्याचवेळात तिने एक लांबच लांब काळा कोट आणलाआणि माझ्या मनात धोक्याची घंटा खणखणली.झालंही तसंच! तिने ऐलान करून टाकलं, " चला कुमी-सुमी, काही काळजी करू नका. आता कुमीची केस मी लढणार आहे आणि सरकारी वकिल म्हणून... " असं