संघटित स्त्रीशक्ती

  • 876
  • 294

"का गं वापस आली? शाळेत जायला निघाली होती न तू?",सुलभा म्हणालीप्रतिभा यावर काहीच बोलली नाही ती मान खाली घालून उदास बसून राहिली. "अगं तुला विचारतेय मी, अशी का बसली नाराज होऊन?",सुलभाने पुन्हा विचारलं "ताई मला खूप कंटाळा आलाय, रोज मी शाळेत जाते त्या रस्त्यावर ती चांडाळ चौकडी असते आणि नाही नाही ते बोलत असतात, कधी एकदम जवळ येऊन घाबरवतात, त्यामुळे आज मी आणि माझी मैत्रीण घाबरून पळून आलो घरी. रोज कसेबसे जातो आम्ही शाळेत जीव मुठीत धरून पण आज कहरच झाला, आज त्यातल्या एका मुलाने माझ्या मैत्रिणीची ओढणीच धरली, ती आणि मी खूप घाबरलो तिने कशीबशी ओढणी सोडवली आणि आलो आम्ही पळून.",एवढं