ऑनलाईन मतदान "सुभाष! ए सुभाष उठ लवकर! सुधाला लेबर पेन सुरु झाले आहेत.", सुभाष ची आई, सुलेखा बाई रात्री एक वाजता सुभाष ला उठवत म्हणाल्या. सुधा, सुभाष ची लहान बहीण. ती माहेरी बाळंतपणा साठी आली होती. तिला रात्री कळा येणं सुरु झालं असल्याने तिच्या आईने तिच्या भावाला उठवलं होतं. सुभाष ने लगेच कार काढली आणि जवळच्या हॉस्पिटल मध्ये सुधा ला ऍडमिट केलं. बरोब्बर सकाळी तीन वाजता एका गोड मुलीला सुधाने जन्म दिला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. नेमकं दोन दिवसांनी इलेक्शन होतं. त्यामुळे सुभाष, सुलेखा बाईंनी सुधाचा दवाखाना सांभाळून मतदान उरकून घेतलं. पण सुभाष ची बायको सुनंदा तिचे नाव तिच्या माहेरच्या गावी नोंदलेले