स्वयंपाकघरातील गमती जमती

  • 294
  • 96

खाद्य भ्रमंती तशी मला शाळेत असल्या पासून  स्वयंपाकाची आवड होती लहान भावाला नवे नवे पदार्थ ..टेस्ट “करायला देणे .माझा आवडीचा उद्योग !!नंतर लग्न होईपर्यंत मी चांगलीच पारंगत झाले होते ..!!आजूबाजूचे लोक माझी आजी आई व सासुबाई यांच्या सारखी मी “सुगरण आहे असे म्हणू लागले ..(!)भावाच्या मित्राच्या सगळ्या पार्टी माझ्या घरीच होत असत ..आठ दहा वर्षापूर्वी ..एकदा आम्ही घरातले सारे सात आठ दिवस बाहेर गावी गेलो होतो घरी येताना हॉटेलमध्ये जेवूनच परतलो कारण बाहेरगावी जाण्यापूर्वी फ्रीज रिकामा केलेला होता ..दुपारी भावाचा फोन ..ताई मित्र आलेत चारपाच ..तुझ्याकडे जेवायला घेवून येतो काहीतरी वेगळे कर ..(तु गावाहून आलीस का....?तुझ्या कडे काय आहे ?..काही आणू का .?.अशी फालतू चौकशी