एका राजकुमारीची गोष्ट

  • 561
  • 180

एके गावात सोमदत्त नावाचा चित्रकार राहत असे. तो रोज सकाळी जवळच्याच शहरात चित्रे विकण्यासाठी जात असे. निसर्गाचे,माणसांचे प्राण्यांचे,मंदिरांचे तो इतके हुबेहूब चित्र काढायचा की बघणाऱ्याला चित्र विकत घेण्याचा मोह होत असे,त्यामुळे भराभर त्याचे चित्रे विकल्या जात असत, आणि संध्याकाळ पर्यंत तो परत आपल्या घरी येत असे. त्याला आईवडील,नातलग नसल्यामुळे घरात तो एकटाच राहायचा. एकदा असेच तो चित्रं घेऊन शहरात गेला,परत येताना त्याला खूप अंधार झाला आणि अंधारात त्याची वाट चुकली,तो भरकटत जंगलात गेला,तिथे बराच वेळ त्याचा रस्ता शोधण्यात गेला पण रस्ता काही मिळाला नाही, त्याला तहान आणि भूक लागली. आता काय करावे ह्या विचारात असताना त्याला दूरवर एक दिवा लुकलूकताना