"कसा दिसतोय मी...?... "blazer घालत ऋग्वेद ने प्रणितील विचारलं... "छान ..."हातात असलेली स्नॅक्स ची प्लेट तिने टेबल वर ठेवली.... "छान..??.. फक्त एवढंच..??..."आरशातून नजर वाळवंट त्याने तिच्याकडे बघितलं .... तर चेहरा काहीसा उदास होता... "नीती..??.. काही झालंय का....?..."तिचे हात हातात घेत त्याने प्रश्न केला... "नाही... मला काय होईल.."प्रणिती ने त्याच्या हातातून हात सोडवले... "माझ्याकडे बघ .... काय झालं..??... ऑफिसमध्ये कोणी बोललं का..??... सांग ना..."ऋग्वेद "काहीही झालेलं नाहीय... आणि please मला एकटं सोडा... तुम्हाला उशीर होत असेल ... जाताना खाऊन जावा..."प्रणिती ने त्याला बाजूला ढकललं ... आणि डोळ्यातलं पाणी अडवत बाथरूम मध्ये पळाली ... "नीती .."वेड तिच्यामागे पळाला पण तिने दरवाजा बंद करून घेतला.. "नीती.. बोल माझ्याशी... काही झाली का...??,....