भाग 59उशीर झाला तरी दोघेही आज तसेच झोपलेले होते...मोहितही लवकर उठून रनिंगला जायचा तोही गेला नव्हता...थकलेले शरीर दोघांचे....ते....तसेच... पुन्हा... निवांत झोपून राहिले आज....मोहित उठला ... त्याने डोळे खोलले आणि समोर ती दिसली....तिला असं निरागसपणे झोपताना बघून त्याला "एखाद्याच्या सहवासासाठी रात्रही अपुरी पडू शकते" हे जे म्हणने ऐकलं होतं त्याच्यावर विश्वास बसला त्याचा.....त्याने मोबाईल हातात घेऊन टाईम बघितला...सकाळचे साडेआठ होऊन गेलेले होते... तो तसाच उठला हळूच तिला धक्का लागणार नाही या दृष्टीने काळजी घेत...पण तरीही तो बेड फोल्डिंगवाला असल्यामुळे... कधी नव्हे तो थोडासा किरकिर वाजला... त्या आवाजाने ती देखील उठली.तेवढ्यात तिचेच लक्ष स्वतःकडे गेले... आणि ती जेवढ्या उमेदीने उठली होती. ....तेवढयाच