अनुबंध बंधनाचे.....( भाग ३६ )अंजलीला भेटीची ओढ लागल्यामुळे भले त्या रात्री ती उशिरा झोपली होती, तरीही आज तिच्या नवीन मोबाईल च्या वाजणाऱ्या अलार्म मुळे पहाटेच तिला जाग आली. दोन्ही हात उंचावत, अंगातील आळस झटकून ती बेडवरून उठते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. आज स्वतःला ती प्रेमच्या नजरेने बघु पहात होती. थोडीशी लाजत चेहऱ्यावरील केसाची बट कानावरून मागे टाकत दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकते. आणि गालातच मिश्कीलपणे हसत हळुवार चेहऱ्यावरील हात बाजुला करत स्वतःला पाहत राहते.थोड्या वेळातच ती त्या भाव विश्र्वातून बाहेर पडते. भेटीच्या उत्सुकतेने ती पटपट बिछाना आवरून घेते. पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहते. आत्ताशे फक्त सात वाजले होते. प्रेम दहा वाजता