व्हिडीओ व फोटोचा वापर चांगुलपणासाठी करावा सध्या फॅशन आली आहे व्हिडीओ बनविण्याची. मग तो व्हिडीओ कोणत्याही पद्धतीनं बनलेला का असेना, लोकं व्हिडीओ टाकतच असतात. त्याचबरोबर फोटोही टाकत असतात. कधी वात्रट तर कधी फॅशन करुन. फॅशनेबल काळ असल्यानं अतिशय तोकडे कपडे घालून व्हिडीओ वा फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची पद्धत अलिकडे रुढ झाली आहे. मात्र त्याला कोणी काहीही म्हणत नाहीत. लोकांना वाटते की त्याचा फायदाच होत असतो आणि लोकांचंही त्यादृष्टीनं बरोबरच आहे. कारण लोकं चांगल्या गोष्टी कधीच पाहणार नाहीत. वाईट गोष्टीकडं मात्र चटकन लक्ष जात असतं. कारण गत काही वर्षापूर्वीच पुनम पांडे वा ममता कुलकर्णी नावाच्या अभिनेत्रीनं असेच फोटो