"तुझा चेहरा एवढा का उतरलाय ..?..."काव्या ने ऑफिस मध्ये आल्या आल्या प्रणिती ला विचारलं ..... खरच एका रात्रीत तिची अवस्था बिघडली होती...डोळे सुजले होते... चेहरा पण सुकून गेलेला.. "काय ग...?.. कुठे लक्ष आहे....?"काव्या "अग न ... नाही ... काही नाही.... ते असच ...."प्रणिती ने चेहऱ्यावरून हात फिरवला.... "एक ... एक मिनिट.... तुझ्या सासरचे तुला त्रास तर देत माहित ना.. असं असेल तर मला सांग हा भल्या भल्याना सरळ केली मी..."काव्या तिच्या शर्ट चे हात वर ओढत अगदी भांडण करायच्या तयारीतच बोलली.... "नाही ग... काल रात्री झोपायला जरा उशीर झाला ना त्यामुळे .."प्रणिती "उशीर...?.. हा..?...अहं ...?..."काव्या ने लागोपाठ तिला कोपर मारला... प्रणिती ने तिच्या कडे बघितलं.... तिच्या