कारंडेंच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर अभिमन्यूला हायसे वाटते व तो स्टाफरूममध्ये येतो. जरा वेळ शांत बसून तो आता झालेल्या संवादाविषयी साधिकाला मेसेज करून कळवतो. त्याने कारंडेंच्या केबिनमध्ये काहीतरी पाहिले पण नेमकं काय हे त्याला आठवत नव्हते. ------------------------------ ------------------------------ ----- घरी आलेली साधिका तिला मंदिरात गुरूजींनी दिलेली चिठ्ठी वाचते. पुन्हा एकदा सुदामाच पत्र मदतीसाठी आलं होतं पण सुरुवात कुठून करायची हे मात्र तिला कळत नव्हतं. तिने लागलीच मारुतीला फोन केला आणि सुदामाविषयी काही सापडतंय का तेही तपासून पाहायला सांगितलं. आजोबंशी सुदामाबाबत बोलायचे ठरवून ती श्रेयाच्या घरी जायला निघते. साधिका : उल्का, मी जरा त्या आजींकडे जाऊन येते आणि मी तुला एक मेसेज