१} विमान प्रकाशनं एकदा विमान पाहिला. विचार केला आकाशी उडीन. त्यानं एक कागदाचा विमान बनवला. त्याला पंख लावले. त्यात एका माणसाचे चित्र ठेवले. नाव दिलं प्रकाश. आता रोजच प्रकाश आकाशात उडू लागला.बोध- स्वप्न मोठं असेल तर ते पुर्ण होणारच. २} लबाड उंदीर एकदा एका उंदरानं भीतीपोटी सापाशी मैत्री केली. म्हणे, "मी तुला मदत करणार." एवढ्यात शिकारी आला. त्यानं सापाला पकडलं व तो त्याला नेवू लागला. त्यानं बराच आवाज लावला. परंतु उंदीर मदतीला आलाच नाही. साप निघून गेल्यावर उंदीर आनंदानं नाचू लागला. बोध- लबाडाशी मैत्री करु नये.३} खरी मैत्री गंपूला पोहणे कठीण वाटायचे. त्यानं एका बेडकाशी मैत्री केली. बेडूक म्हणाला, "गंपू माझ्याकडे ये. मी पोहायला शिकवतो."गंपू बेडकाकडे गेला आणि