भाग-२६ सावलीने मग एक युक्ती लावली आणि तिने आईला सांगितली, ती म्हणाली, "आई कोमल माझी गोष्ट कसल्याही प्रकारे ऐकणार नाही तर तू एक काम कर तू कोमलला सांगुन थेट त्याला घरी बोलावून घे आणि मग त्याचा पालकांशी बोलण्याचा बहाण्याने त्यांचा घराचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर मागून घे. मग मीआपल्यापरीने त्याची संपूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न करते.” आईला सावलीची युक्ती एकदम पटली आणि तीकोमलचा रुममध्ये गेली आणि म्हणाली, "बेटा कोमल, तुझी अशीच इच्छा असेल तर ठीक आहे, माझा तुला संपूर्ण पाठींबा आहे. परंतु त्या आधी मला त्या शशांक बरोबर काही बोलायचे आहे. तर त्याला तू घरी बोलाव मात्र यावेळेस खिडकीतून