"सीमा आपण लग्न करायचं तर एकाच मांडवात, तसं मी माझ्या आईबाबांना सांगितलं आहे. तू सुद्धा सांगितलं आहे ना काका काकूंना?" रीमा "हो ग! आपण लहानपणी पासून ठरवलेलं मी कशी बरं विसरेन." सीमा सीमा आणि रीमा बालपणापासूनच्या मैत्रिणी. शाळा एक, कॉलेज एक, नोकरीचे ठिकाण एक. आता लग्नाच्या वयाच्या झाल्या असल्यामुळे त्यांच्या आईबाबांनी त्यांच्यासाठी स्थळं बघणं सुरु केलं होतं. सीमा ला एक स्थळ पसंत पडलं. मुलाकडील मंडळीची झट मंगनी पट ब्याह करण्याची इच्छा होती पण सीमाने त्यांना सांगितले की माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरल्याशिवाय मी लग्न करणार नाही. सीमाच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे सोहम ने ते मान्य केलं.रीमाला मात्र एकही स्थळ पसंत पडेना. शेवटी होहो नाहीनाही म्हणता