पावसांच्या सरी - भाग 3

  • 1.2k
  • 516

आज एवढं ट्रॅफिक का झालंय, काही कळत नाही. मोबाइलवर सतत मेसेज नोटिफिकेशन्स येत आहेत. "जाऊ दे," असं मनाशी म्हणत, ऑफिस संपल्यावर घरी जाऊन बघू असं ठरवलं. या विचाराने मी मोबाइलकडे दुर्लक्ष केलं आणि रस्त्यावर ट्रॅफिक मोकळं होण्याची वाट पाहू लागलो. बघता बघता या कंपनीत आठ वर्षं कधी झाली, ते कळलंच नाही. खरं तर, इतक्या लांब नोकरीसाठी येईन, याची कल्पनाही नव्हती. पण काही महिन्यांचाच काळ उलटला असावा, असे वाटत असतानाच संपूर्ण आठ वर्षं कधी निघून गेली, हे समजलेच नाही. शेवटी ट्रॅफिक मोकळं झालं, आणि माझ्या कारने वेग घेतला. पुढच्या तीस मिनिटांतच मी घरी पोहोचलो. शाळेला सुट्टी असल्यामुळे घरचे सगळे गावाकडे गेले