जय गुरूदेव

  • 1.8k
  • 1
  • 393

जय गुरुदेव         आरत्या म्हणून झाल्या अन् भक्तगणानी दोन्ही हात जुळवून मस्तकाला टेकवीत डोळे मिटून घेतले.नेहमीच्या सेवेकऱ्यानी नित्यनेमाप्रमाणे ‘दिगंबरा दिगंबरा’ हे भजन हलक्या टाळीच्यासाथीवर म्हणायला सुरुवात केली. नवख्यांनी सरसावून त्यांच्या सुरात सूर मिळविले.हळू हळू भजनाची लय वाढत गेली. अन् अकस्मात “अवधूत चिंतन श्री बालमुकुंद गुरुदेवदत्त” किनऱ्या स्वरात उच्चारीत महाराज उठले. जवळजवळ तास दीड तास पादुकांसमोर,चांदीच्या चौरंगावर बसून राहिल्यामुळे पायात मुंग्या आलेल्या... उठून उभे राहता क्ष