कुंभमेळ्यात स्नान केलं तरी

कुंभमेळ्यात स्नान केलं तरी?               *कुंभमेळ्यातील स्नानावर एक गाणं प्रसिद्ध आहे. कभी प्यासे को पानी पिलाया नही. गंगा नहाने से क्या फायदा? गंगा नहाकर कोई फायदा नही, अगर मन के तुच्छ विचार न त्यागे तो. अशा आशयाचं ते गाणं. गाणं जुनं जरी असलं तरी आजच्या समाजातील लोकांच्या वागण्यावर चपखल बसतं.*            सध्याच्या काळात कुंभमेळा सुरु आहे. हा योग दर बारा वर्षांनी येतो. लोकं कुंभ स्नान करायला आवडीनं जात आहेत. तेथील पाण्यात आंघोळ करीत आहेत. हे सगळं बरोबर असून यात एक आख्यायिका आहे की त्या कुंभमेळ्यात आंघोळ केल्यानं आपलं सबंध पाप धुतलं