श्रेयाच्या घरातून निघालेली साधिका थेट गुरूंच्या घरी येते. ती येताच तिचे गुरु तिला हातपाय धुवून त्यांच्या खोलीत यायला सांगतात. आजोबा : हे हळदीच दूध घे... तुला जरा ताकद आल्यासारखं वाटेल... साधिका : आजोबा तुम्ही या दुधात कोणती औषधी मिसळता? आजोबा : काहीही मिसळत नाही...साधिका: खरच? आजोबा : हो... अगदी खरं... बर तू सांग... कामगिरी कशी पार पडली? तस बघायला गेलं तर अगदी सोप्प काम होतं... साधिका : हो.. पण आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नाही हे प्रकरण... आजोबा : हो.. मगाशी शोध घेतला मी त्याचा... त्या मुलीला अडकवलं गेलं आहे.. तुला आठवत तारा... मी तुला अभिमन्यू नावाच्या मुलाबद्दल सांगितलं होतं... साधिका : हो... त्या मुलाचा इथे काय संबंध? आजोबा : आहे... बघ जे मला जाणवलं ते