जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग कसा असावा अंकुश शिंगाडे लेखक नागपुर ९३७३३५९४५०,९९२३७४७४९२ भारत स्वतंत्र्य झाला.भारतात प्रजासत्ताक आलं.पण जातीय द्वेष अजुनही कायम आहे.२५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाळली.१९ मार्च १९२७ ला चवदार तळ्याचं आंदोलन केलं गेलं,तो आंदोलनाचा खटला ही १९३७ पर्यंत लढला गेला.हवं तर त्या खटल्यात बाबासाहेबांनी जीवाचे प्राण ओतुन तो खटला जिंकलाही.तसेच दलितोद्धारासाठी संविधान ही लिहिल्या गेलं असलंं तरी आजही जातीय द्वेष कायम आहे.त्याची कारणे पुढीलप्रमाणे अ)कारणे १)चवदार तळ्याच्या आंदोलनात इतर अस्पृश्य समाजाचा पाहिजे तेवढा सहभाग नव्हता इतर समाज अस्पृश्य असुनही स्वतःला