स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक? स्वातंत्र्य घेता का हो स्वातंत्र्य. असं जर कोणी आपल्याला दिसलं तर आपण म्हणू की संबंधीत व्यक्तीला वेड तर लागलं नाही ना. तसं पाहिल्यास आज हेच म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्त जगणं. मनात येईल तसं जगणं. एवढा सोपा अर्थ आहे. आज हेच स्वातंत्र्य हिरावत चाललेले दिसत आहे. कारण आज माणसाच्या मनात चांगले विचार उरलेलेच नाही. सर्व कुविचार भरलेले आहेत. तरीही कालानुकाल काही थोर महात्म्ये जन्म घेतात व माणसाच्या मनातील कुविचारांचं शुद्धीकरण करतात. जसा रक्तात आलेला भेसळपणा दूर केला जातो. अर्थात कोलेस्टेरॉल वाढले असेल वा रक्त जाडसर झाले असेल