भाग्य दिले तू मला ...... भाग -७

"शौर्य काय करतोय तू हे.... तिचे केस मागे घेतोय .... तिला असं एकटक पाहतोयस... तिला व्यवस्थित झोप लागावी म्हणून तिला उचलून बेडवर झोपवतोय.... कंट्रोल कर स्वतःला ... तू असा तिच्याकडे आकर्षित कसा होऊ शकतो.... विसरलास का.... ती काय वागली आहे तुझ्याशी ..."त्याच मन त्याला आतून ओरडून सांगत होत.... "नाही ,.... मी काहीच विसरलो नाही... हा शौर्य सूर्यवंशी त्याचा झालेला अपमान कधीच विसरणार नाही ..... आणि तिला हि विसरू देणार नाही.... मिस नंदिनी राणे ... तू माझी बायको झाली कारण कुणाच्या तरी वाचनात मी अडकलो होतो... पण याचा अर्थ मी तुला माफ केलं असा होत नाही... तू केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तुला